Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोना बाधितांचा आकडा तिनशेपार!

corona virus

corona virus

बीड दि.22 ः राज्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र बाधितांचा आकडा वाढत आहे. हळूहळू हा आकडा वाढतच आहे. शनिवारी (दि.22) जिल्ह्यात 307 कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.

बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.22) प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 2 हजार 414 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 2 हजार 107 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले तर तीनशे सात रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 81 रुग्ण हे अंबाजोगाई येथील आहेत. बीड-46, आष्टी-16, धारुर-8, गेवराई-19, केज-20, माजलगाव-32, परळी-41, पाटोदा-19, शिरुर-8, वडवणी-17 असे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची वाढती संख्या पाहता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच नियमाचे पालन करणे महत्वाचे आहे.

Exit mobile version