Site icon कार्यारंभ लाईव्ह

जिल्हा कचेरीच्या आवारातील रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार

बीड शहरात खळबळ

बीड दि.25 : येथील रजिस्ट्री कार्यालयात शेतीच्या वादातून एकावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.25) सकाळी 11च्या सुमारास घडली. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्याना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सतीश बबन क्षीरसागर (रा.लक्ष्मी नगर बीड), फारुक सिद्दीकी असे जखमीचे नाव आहे. येथील रजिस्ट्री कार्यालयामध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामधे ते जखमी झाले आहेत. उपचारासाठी जिल्हा रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मिथा राव, पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड, उपनिरीक्षक मीना तुपे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा गोळीबार कशामुळे झाला याचे कारण मात्र समजू शकले नाही. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version