Site icon कार्यारंभ लाईव्ह

५ कोटी न दिल्यास बलात्काराची तक्रार करणार; धनंजय मुंडेना महिलेची धमकी

dhananjay munde

dhananjay munde

महिलेविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत, एका महिलेने ५ कोटीची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे.

या धमकी प्रकरणी मुंबईच्या पोलीस ठाण्यात इंदौरच्या महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय नंबरवरुन या महिलेने मुंडे यांना फोन करत ५ कोटी रुपये किंमतीचे दुकान व महागड्या मोबाइलसाठा तगादा लावला होता. तसंच जर मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मिडियावर बदनामी करण्याची धमकी देत, पून्हा गुन्हा दाखल करण्याची धमकीही महिलेने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version