Site icon कार्यारंभ लाईव्ह

रुमणं दाखवत किसान सभेचा विमा कंपन्यांना इशारा

kisan sabh beed

शेतकर्‍यांबद्दल कळवळा असल्यााबत ढोंग करू नका- जगदीश फरताडे
शेतकर्‍यांबद्दल खोटा कळवळा दाखवून आता अनेकजण पुढे आलेले आहेत. पण त्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारावेत की या विमा कंपन्यांसोबत करार होत असतानाच तुम्ही शेतकरी विरोधातील नियामांवर का बोलले नाहीत? आता निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेकांना शेतकर्‍यांची काळजी वाटत आहे. परंतु आता ही लढाई शेतकरी पुत्रांनी हातात घेतलेली असून तो आता सोशल माध्यमांवरही फाईट देऊन वातावरण टाईट करू लागला आहे. किसान सभा शेतकर्‍यांना शेतकर्‍यांचे हक्क दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे जगदीश फरताडे यांनी सांगितले.

वर्गणी गोळा करून घरून भाकरी बांधून आले होते कार्यकर्ते

आजच्या किसान सभेच्या मोर्चाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र मोर्चा सभास्थळी येताच पावसाला सुरुवात झाल्याने नियोजन विस्कळीत झाले. मात्र अशाही वातावरणात अनेक शेतकरी भर पावसात सभेला प्रतिसाद देत होते. काहींनी तर सोबत आणलेल्या भाकरी सोडून त्या खात खात सभा ऐकली.

Exit mobile version