Site icon कार्यारंभ लाईव्ह

विद्यार्थ्याला पिस्तूल लावून 20 लाखांच्या खंडणीची मागणी!

arrested criminal corona positive

beed police

अवघ्या चार तासात एलसीबीने आरोपींच्या आवळल्या मुसक्या
केशव कदम
बीड दि.24 : पैसे देण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थ्याला दुचाकीवर बसवून अनोळखी मित्राजवळ नेले. तिथे त्याला पिस्तूल, खंजीर दाखवून दमदाटी करत पैशांची मागणी केली. त्यानंतर लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने अवघ्या चार तासात दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, एक सुरा, एक कुकरी, दोन चाकू असे धारदार शस्त्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

मनिष प्रकाश क्षीरसागर (वय 23, रा.स्वराज्यनगर, बीड), शैलेश संतोष गिरी (वय 23, रा. कागदीवेस बीड) अशी आरोपींची नाव आहे. जय विशाल हजारी (वय 19 रा.एस.पी. ऑफीस समोर, बीड) यास आरोपींनी खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतीश वाघ, उपनिरीक्षक संजय तुपे, रामदास तांदळे, बाळकृष्ण जायभाये, मारुती कांबळे, राजु पठाण, गणेश हांगे, अर्जुन यादव, चालक अतुल हराळे यांनी केली.

Exit mobile version