Site icon कार्यारंभ लाईव्ह

शिवसेना भवन तीन दिवस बंद राहणार

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दादर परिसरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरातील शिवसेना भवन पुढील काही दिवसांसाठी खबरदारी म्हणून बंद करण्यात आले आहे.

लॉकडाउनच्या परिस्थितीत शिवसैनिकांकडून गरजू आणि गरिबांना मदत पुरवली जात आहे. त्यामुळे शेकडो शिवसैनिक सध्या मदतकार्याचे काम करत आहे. अनेक शिवसैनिकांची शिवसेना भवनावर ये जा सुरू असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिवसेना भवन पुढील 3 दिवस बंद राहणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शिवसेना मुख्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सेनेकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version