Site icon कार्यारंभ लाईव्ह

सात भारतीय कंपन्यांनी लस corona vaccine बनविण्यासाठी घेतलाय पुढाकार

corona vaccine

corona vaccine

echo adrotate_group(3);

मुंबई, दि. 20 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस corona vaccine विकसीत करण्यासाठी प्राणाची बाजी लावून काम करीत आहेत. काहीजण यशाच्या अगदी जवळ आहेत. इतर देशांप्रमाणे भारतातील सात औषधी कंपन्याही यावर काम करीत आहेत. भारतातील आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र द हिंदू ने हे वृत्त दिले आहे.echo adrotate_group(6);

देशातील भारत बायोटेक bharat biotech, सीरम इंस्टीट्यूट seruminstitute, जायडस कॅडिला zyduscadila, पेनेशिया बायोटेक panaceabiotec, इंडियन इम्यूनोलॉजिकल्स ndimmune, मैनवैक्स mynvax, आणि बायोलॉजिकल biological, इत्यादी कंपन्या कोविड -19 ची लस बनविण्याच्या कामात व्यस्त आहेत. सामान्य परिस्थितीत एखादी लस शोधून ती तयार होऊन बाजारपेठेत दाखल करेपर्यंत चार ते पाच वर्ष लागतात. परंतु कोरोना महामारीच्या अनुषंगाने अशी लस काही महिन्यात बाजारपेठेत दाखल होईल, अशी आशा शास्त्रज्ञांना वाटत आहे.echo adrotate_group(8);

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन ‘कँडिडेड’च्या पहिल्य आणि दुसर्‍सा फेजमधील क्लिनिकल चाचणीला परवानगी मिळालेली आहे. त्याची निर्मिती कंपनीच्या हैद्राबादमध्ये करण्यात येणार आहे. कंपनीला यासाठी आयसीएमआर आणि राष्ट्रीय विज्ञान विज्ञान संस्था (एनआयवी) चे सहकार्य मिळत आहे.echo adrotate_group(9);

वर्षाच्या शेवटपर्यंत लस हातात येईल, सिरमला आशा

भारतीय कंपनी असलेल्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला आशा आहे की या वर्षाच्या शेवटी कोविड -19 ची वैक्सीन तयार असेल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला ने सांगितले की आम्ही अ‍ॅस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड सोबत वैक्सीन वर काम करत आहोत. तिसर्‍या फेजमधील क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. आम्ही ऑगस्टमध्ये देशात ह्यूमन ट्रायल सुरू करणात आहोत. आतपर्यंतच्या क्लिनिकल चाचण्यांची जी माहिती आम्हाला उपलब्ध झाली आहे ती पहाता आम्हाला आशा आहे की, या वर्षीच्या शेवटापर्यंत कोरोनावरील लस आमच्या हातात असेल.

कॅडिलाला सात महिन्यांचा अवधी

औषध कंपनी ज्युडस कॅडिला चेअरमन पंकज आर. टेम्पल यांनी सांगितले की, ते कोविड -19 ची लस ‘कँडिडेट’ जाइकोव-डी चे सर्व फेज सात महिन्यात पूर्ण करु. आतापर्यंतच्या परिक्षणातून जो डेटा हाती आला आहे तो उत्साहवर्धक आहे. पुढेही परिक्षण पुर्ण यशस्वी झाल्यास लस उपलब्ध व्हायला सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या कंपनीसोबत केला करार

पॅनेशिया बायोटेक ने जूनमध्ये सांगितले होते की त्यांनी कोविड -19 ची लस विकसीत करण्यासाठी अमेरिकेच्या रेफाइनाबरोबर आयरलैंडमध्ये संयुक्तपणे काम सुरु केलेले आहे. नॅशनल डेयरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) चे इंडियन इम्यूनोलॉजिकल्सने सुध्दा कोरोना विषाणूवरील लस विकसीत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठाशी करार केला आहे. याव्यतिरिक्त मायनवैक्स आणि बायोलॉजिकल देखील कोविड -19 ची लस तयार करण्यासाठीचे काम करीत आहेत. echo adrotate_group(1);

Exit mobile version