bharat biotech

भारतात कोरोना लसीचे ह्यमन ट्रायल यशस्वी

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

मुंबई : रशियाने कोरोना लस शोधल्याचा दावा केल्यानंतर आता भारतही त्याच दिशेने पावलं टाकत आहे. गेल्या महिनाभरापासून भारत बायोटेक BHARAT BIOTECH आणि आयसीएमआर ICMR या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावरील लस विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला गेला होता. आता त्याला यश आले असून कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल (मानवी चाचणी) यशस्वी झाल्याची माहिती येत आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या वृत्तात म्हटले आहे की, कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी ठरली आहे. चाचणीच्या प्राथमिक टप्प्यातील निकालांनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. भारतातील 12 शहरांमध्ये 375 स्वयंसेवकांवर करोना लसीची चाचणी करण्यात आली होती. त्यातील प्रत्येकाला या लसीचे दोन डोस देण्यात आले. यानंतर त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. ही करोना लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही जेवढ्या स्वयंसेवकांना ही लस दिली त्यांच्यावर कोणतेही साईडइफेक्ट्स जाणवले नसल्याची माहिती पीजीआय रोहतकमध्ये सुरू असलेल्या चाचणीच्या टीम लीडर सविता वर्मा यांनी दिली. त्या म्हणाल्या, आता स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या रक्ताचे नमूने गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. रक्ताच्या नमून्यांद्वारे लसीच्या इम्युनॉडेनिसिटीचा अभ्यास करण्यात येणार आहे. ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे याची आम्हाला खात्री झाली आहे. आता दुसर्‍या टप्प्यात ही लस किती प्रभावशाली ठरते हे पाहिलं जाणार आहे. त्यासाठी आम्ही रक्ताचे नमूने घेण्यास सुरूवात केली आहे, असं सविता वर्मा म्हणाल्या. ही लस सुरक्षित आहे. एम्समध्ये भारत बायोटेकच्या लसीच्या चाचणीसाठी 16 स्वयंसेवकांना दाखल करण्यात आलं होतं, अशी माहिती दिल्लीतील एम्सचे प्रमुख संजय राय सांगितलं.
कोवॅक्सिन ही देशातील पहिली लस असून भारत बायोटेकद्वारे आयसीएमआरसोबत ही लस विकसित करण्यात येत आहे. सर्व 12 ठिकाणी या लसीच्या सुरक्षिततेचे निकाल पाहिल्यानंतर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी कंपनी दुसर्‍या टप्प्यात संपर्क साधणार आहे. जर सर्व बाबी योग्य असतील तर लसीच्या वितरणाबाबत निर्णय होईल.
आयसीएमआरने दिली होती 15 ऑगस्ट पुर्वीची डेडलाईन
मागच्या महिन्यात आयसीएमआरने भारत बायोटेक कंपनीला 15 ऑगस्टपुर्वी मानवी चाचण्या पुर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते. आज 14 ऑगस्टला त्याचे रिझल्ट दिसले आहेत. उद्या 15 ऑगस्ट असून पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. त्यामुळे मोदी लसीच्या यशस्वीतेबाबत उद्या काय घोषणा करतील याकडे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. दरम्यान 15 ऑगस्टपुर्वी ह्यूमन ट्रायल पुर्ण करण्याबाबत आयसीएमआरने दिलेल्या निर्देशाबाबत जगभरातून टिका होत होती. त्यातच सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनीही आम्हाला लस बनविण्याची इतकी घाई नाही, असे म्हणत या लसीबाबत अप्रत्यक्षपणे टिका केली होती.

Tagged