Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड : जिल्हा कारागृहातील 59 आरोपी पॉझिटिव्ह

beed jilha karagruh

beed jilha karagruh

बीड : जिल्ह्यासाठी आजचे रिपोर्ट धक्कादायक ठरले आहेत. कारण 234 आरोपींची आज अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात तब्बल 59 आरोपी पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात 128 आरोपी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.
कारागृहातील एका कैद्याचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील इतर आरोपींच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यात 59 आरोपी पॉझिटिव्ह आले.
पर्यायी व्यवस्था असताना आरोपी पॉझिटिव्ह कसे?
जिल्हा कारागृहात आरोपी नेण्यापुर्वी त्यांना 15 दिवस बाहेरच्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येते. त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना कारागृहात पाठवण्यात येते. असे असताना जिल्हा कारागृहात कोरोना शिरलाच कसा काय हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

Exit mobile version