Site icon कार्यारंभ लाईव्ह

सिंचन विहिरींची मर्यादा पाच वरून वीस पर्यंत वाढविण्याचा निर्णय

पैठण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्यात येणार्‍या सिंचन विहिरींची मर्यादा 5 वरुन 20 पर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (म.ग्रा.रो.ह.यो.) एका ग्रामपंचायतमध्ये एका वेळी 5 सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी घालून देण्यात आलेली होती. सिंचन विहिरींच्या कामांची शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून श्री.भुमरे यांनी पुढीलप्रमाणे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी दिली आहे.

ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विहिरीची मर्यादा
लोकसंख्या विहिरी
1500 5
1501 ते 3000 10
3001 ते 5000 15
5001 पेक्षा जास्त 20

तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश
या निर्णयामुळे शेतकर्‍यांना अधिकाधिक सिंचन विहिरी लाभ मिळणार असल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादनात भर पडून शेतकर्‍यांना आर्थिक उन्नती होणार असल्याने निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश श्री.भुमरे यांनी यावेळी दिले.

Exit mobile version