Site icon कार्यारंभ लाईव्ह

विहिरीत आढळला दोघांचा मृतदेह

budun mrutyu-panyat budun mrutyu

budun mrutyu-panyat budun mrutyu

घातपात की आत्महत्या, गेवराई तालुक्यात खळबळ
गेवराई: तालुक्यातील माटेगाव परिसरात एका विहिरीत 17 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आत्महत्या आहे की घातपात याचा तपास चकलंबा पोलीस करत आहेत.
शुभम रोहिदास कापसे (वय 17 रा.भाटअंतरवली ता.गेवराई) व कावेरी राजेंद्र खंदारे (वय १६ रा.पाथरवाला खुर्द ता.गेवराई) या दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगताना माटेगांव शिवारातील एका विहिरीत आढळले. दोघे मावस बहीण भावंडे आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, पोकॉ. अमोल औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून उमापूर प्रा.आ.केंद्रात शवविच्छेदनासाठी आणले आहे. प्रा.आ.केंद्रात शववीच्छेदनाची प्रक्रीया सुरु आहे. सदरच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version