बीड- शॉटसर्किटने लागलेल्या आगीत बीड शहरातील नगररोडवरील एलआयसी कार्यालय जळून खाक झाले आहे. यामध्ये कोटीच्या पुढे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आग मध्यरात्री दोनच्या सुमारास लागली होती.
बीड शहरातील एलआयसी ऑफिसला मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. सुरुवातील दुसरा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. याची माहिती अग्नीशामक दलाला देण्यात आल्यानंतर आग विझविण्यासाठी गाड्या लवकर न आल्याने दोन्ही मजले जळून खाक झाले आहेत. ब्रांच मॅनेजर यांच्या कॅबिनच्या बाहेर शॉटसर्किट होऊन ही आग सर्व कार्यालयात पसरली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सकाळी 7 च्या सुमारास ही आग विझविण्यात आली असून यात दीड ते दोन कोटींचे नुकसान झाले आहे
बीड शहरातील एलआयसी ऑफिस जळून खाक
