आष्टी- आष्टी तालुक्यात माणसांवर हल्ले करणारा बिबट्या आता करमाळ्याकडे सरकला असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी सायंकाळी करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी येथील कल्याण देवीदास फुंदे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यामुळे आष्टी तालुक्यात वावरणारा बिबट आणि करमाळ्यात हल्ला करणारा बिबट एकच असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. ज्या फुंदेवाडी गावात हा हल्ला झाला ते गाव आष्टीपासून जवळच कर्जत तालुक्याच्या सीमेलगत आहे.
आष्टीचा बिबट्या करमाळ्याला? फुंदेवाडी येथील तरूण बिबट्याच्या हल्ल्यात ठार!

bibatya