Site icon कार्यारंभ लाईव्ह

शिवाजीनगर ठाण्यातील लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

acb office beed

acb office beed

 बीड दि.27 : शहरातील बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एका पोलीस कर्मचार्‍यास सात हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.27) दुपारच्या सुमारास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
चरणसिंग वळवी असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. वळवी यांची शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. शिवाजीनगर ठाण्यात एनसी दाखल होती. यातील आरोपींवर कारवाई न करण्यासाठी आरोपीनाच वळवी यांनी पैशाची मागणी केली. तडजोडीअंती सात हजाराची लाच स्विकारताना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत बस स्थानकातील पोलीस चौकीमध्ये वळवी यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रव्रिंद परदेशी, श्रीराम गिराम, गोरे, पोशि.गारदे, कोरडे यांनी केली. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Exit mobile version