Site icon कार्यारंभ लाईव्ह

राज्यभरातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बदलल्या

पशुसंवर्धन विभागाचे परिपत्रक जारी
बीड : राज्यभरातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बुधवारपासून (दि.4) बदलण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाचे Department of Animal Husbandry कार्यासन अधिकारी डी. जी. शेडमेखे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांना याबाबतचे पत्र दिले आहे.

यापूर्वी राज्यभरात पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा दोन प्रकारच्या होत्या. त्यात 1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर या काळात सकाळी 8 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 तर 1 ऑक्टोबर ते 30 जानेवारी या काळात सकाळी 7 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते सायंकाळी 6 अशा वेळा होत्या. यात बदल करून आता सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 4.30 (दुपारी 1 ते 1.30 जेवणाची वेळ) तसेच शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 अशी वेळ असणार आहे. या वेळा पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी -1 व 2, तालुका व जिल्हा पशु चिकित्सक सचिवालये, फिरता पशुवैद्यकीय दवाखाने यासाठी असणार आहेत. शिवाय, आकस्मिक परिस्थितीत पशुपालकांना 24 तास सेवा उपलब्ध असणार आहे.
…तर तक्रार करणार : शार्दूल देशपांडे
नवीन परिपत्रकाप्रमाणे शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी वेळेवर उपस्थित राहावे. नसता लेटलतीफांच्या तक्रारी करून कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार, अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दूल देशपांडे यांनी दिली.

Exit mobile version