Site icon कार्यारंभ लाईव्ह

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांच्या गाडीला अपघात


बीड दि. 17 : पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना बीड तालुक्यातील उखंडा तलावाजवळ नगररोडवर मंगळवारी (दि.16) मध्यरात्री घडली. यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक धांडे (57), पोह.राजेंद्र शिंदे (55), चालक प्रताप घोडके (47),
उमा उद्धव मोरे (40) महिला, गंभीर जखमी उद्धव लक्ष्मण मोरे (50), तेजस मोरे (15), आनंद मोरे (25) हे जखमी आहेत. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे यांनी स्वतःची गाडी घेऊन घटनास्थळी धाव घेतली. जयंत वाघ, शिवराज धांडे, हेमंत वाघ, पंकज धांडे, श्याम धांडे, अजिंक्य धांडे, गणेश झुंगुरे यांनी अपघातातील जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्ते, सर्जन डॉ. सचीन देशमुख, डॉ.मजित सर याना दिली. वेळेवर मदत व उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Exit mobile version