Site icon कार्यारंभ लाईव्ह

आप्पासाहेब जाधव शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख!


बीड दि.22 : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सचिन मुळक यांना हा अनपेक्षित धक्का मनाला जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड व लातूर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माजलगाव, परळी, केज विधानसभा जिल्हाप्रमुखपदी आप्पासाहेब कडाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली. तर उपजिल्हाप्रमुखपदी गणेश वरेकर, शिवाजी कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आप्पासाहेब जाधव यांच्या निवडीमुळे माजलगावमध्ये आनंदोत्सव केला जात आहे.

Exit mobile version