Site icon कार्यारंभ लाईव्ह

सुर्डी प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित!

प्रतिनिधी । बीड
दि.24 ः माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी माजलगावच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता गायकवाड यांना पोलीस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या संदर्भातील माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. दरम्यान निता गायकवाड यांनी न्यायालयात आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली नव्हती, त्यामुळे न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर या प्रकरणातील तपासी अधिकारी महिला सपोनि. नीता गायकवाड यांना निलंबित करावे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. यासंदर्भात अनेक शिष्टमंडळांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. अखेर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सपोनि. नीता गायकवाड यांच्यावर शनिवारी निलंबनाची कारवाई केली.

Exit mobile version