Site icon कार्यारंभ लाईव्ह

पीक कर्ज न देणार्‍या बँकावर कारवाई करा – पालकमंत्री धनंजय मुंडे

dhananjay munde

dhananjay munde

आढावा बैठकीत प्रशासनाला सुचना

बीड : खरिपातील पिक कर्ज वितरणासाठी बँकांकडून दिरंगाई झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत येऊ शकतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी वाटप होताना दिसत असून याबाबतचे कारण शोधण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी नंतर पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येता कामा नये. राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही ठराविक वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

ते म्हणाले, काही विशिष्ट बँका शेतकर्‍यांना दाद देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. पात्र शेतकर्‍याला पीककर्ज मिळण्यासाठी अडचण करत असलेल्या अशा बँकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व याचा स्वतः जिल्हाधिकार्‍यांनी दर आठवड्याला आढावा घ्यावा, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात योजना जिल्ह्यातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करीत त्रुटी दूर करून शेतकर्‍यांना लाभ द्यावा.

भूसंपादन विषयातील मावेजांचे प्रकरणे तातडीने सोडवा..
भूसंपादन प्रकरणांमध्ये कोर्टाकडून आदेश पारित झालेल्या प्रकरणी संबंधित मावेजा देण्याबाबत दीर्घकाळ जात असून यात पिढ्या जात आहेत. सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी पावले उचलणे गरजेचे आहे. रेल्वे भूसंपादनाबाबत देखील असलेल्या अडचणी राज्यस्तरावर चर्चेसाठी घेतल्या जातील असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

महावितरणच्या कामांना जिल्हा नियोजन मधून निधी देऊ
महावितरणच्या प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले जावेत, वीज प्रश्न, नवीन मागण्या सोडविण्यासाठी वसुली व निधीतून उपलब्ध पैसा वापरावा, तसेच आवश्यक त्या बाबींसाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देऊ असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना फळ फळपीक अनुदान योजना यासह विविध बाबींचा आढावा घेतला.

पिकविम्या संदर्भात राज्य स्तरावर होणार बैठक

आढावा बैठक थोडक्यात

Exit mobile version