Site icon कार्यारंभ लाईव्ह

एकनाथ शिंदेंना मिळाले शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहेत. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिले आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिले आहे.
    एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.

 

Exit mobile version