Site icon कार्यारंभ लाईव्ह

पाकिस्तान हादरला! कराची शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला

terror attack in pakistan

pakistan stock exchange attack

कराचीः दहशतवाद्यांना पाठीशी घालणे पाकिस्तानला चांगलेच जड जाताना दिसत आहे. आज सकाळी 10 वाजता कराचीतील शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पाच जण ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये चार दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानामध्ये खळबळ माजली आहे.

कसा झाला हल्ला?
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यात चार दहशतवादी सामिल असल्याची माहिती सीसीटीव्हीतून समोर आली. हे चारही दहशतवादी सुरक्षा यंत्रणांच्या चकमकीत ठार झाले असल्याची माहिती पाकिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांचा गणवेश घातला होता. एका वाहनातून आलेल्या या दहशतवाद्यांनी पार्किंगमध्ये शिरकाव केला. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारावर हल्ला केला. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घालण्यात आले.

शेअर बाजार इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version