Site icon कार्यारंभ लाईव्ह

कामगार नेत्याने घेतला गळफास; हत्या की आत्महत्या चर्चेला उधान

PAITAHN NEWS

पैठण : एमआयडीसी येथील अजंताफार्मा कंपनीच्या कामगार नेत्याने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. या कंपनीतील कामगार नेता वैजिनाथ पंडीतराव काळे (वय 45 रा. शैलजानगर मुद्दलवाडी, पैठण) असे आत्महत्या केलेल्या कामगार नेत्याचे नाव असून या कामगार नेत्यांनी आत्महत्या केली का हत्या करण्यात आली? याबाबत पोलिस शोध घेत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे हे बुधवारी सकाळच्या शिफ्टमध्ये काम करण्यासाठी सकाळी कंपनीत पोहचले संध्याकाळी कंपनीच्या दुसर्‍या शिफ्टचे कामगार कंपनीत आले असता कंपनीच्या दुसर्‍या मजल्यारील गोडावूनमध्ये कामगारांना नेते वैजीनाथ काळे हे फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत अजंता फार्माच्या व्यवस्थापनाने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दिल्यानुसार या गंभीर घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली. वैजीनाथ काळे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील मौजे बाजार सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. त्यानी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले यांची आत्महत्या का हत्या? याबाबत कामगार वर्गात चर्चा सुरु असून त्यांचा कंपनी व्यवस्थापनाशी काही वाद होता का.? काळे यांनी घरगुती कारणामुळे आत्महत्या केली का? किंवा आणखी काही वेगळे कारणे आहेत का अशी असे प्रश्न या घटनेमुळे उभा राहिले आहे दरम्यान मयत काळे यांच्या नातेवाईकांनी सखोल चौकशीची मागणी केली. बुधवार रोजी या घटनेचे तपासकामी पोलीस पथक मयत काळे यांच्या मूळ गावाला जवाब घेण्यासाठी जाऊन आले आहे. मात्र नातेवाईक सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पोलिसांना रिकामे हात परतावे लागले.

गोदापात्रातून वाळू तस्करी; दोन ट्रॅक्टरसह जेसीबी जप्त

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

कार्यारंभ ई-पेपर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Exit mobile version