Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोना पॉझिटीव्ह फरार आरोपीसह अन्य एक गजाआड

arrested criminal corona positive

beed police

खुनाच्या गुन्ह्यात होते फरार

 बीड :  खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सदरील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तो फरार झाला. या आरोपीसह खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणखी एका आरोपीच्या पोउपनि.संतोष जोंधळे यांनी कळंब तालुक्यातील आढळा शिवारातून शनिवारी (दि.1) मुसक्या आवळल्या आहेत.

      केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील पुजार्‍याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवल होते. 22 जुलै रोजी एका आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने आणि कोरोनाची लक्षणे सौम्य झाल्याने त्याला आयटीआयमधील कोव्हीड सेंटरमध्ये रेफर करण्यात येणार होते. मात्र याच वेळी त्याने संधीचा फायदा घेत रुग्णालयातून पळ काढला.

     स्थानिक गुन्हे शाखा या आरोपीच्या शोधात होती. शनिवारी वसंत गोविंद पवार व कोरोना पॉझिटीव्ह फरार आरोपी दोघेही कळंब तालुक्यातील आढाळा परिसरात असल्याची माहिती मिळाली. एक आरोपी पॉझिटीव्ह असल्यामुळे पोलीसांनी हॅन्डग्लोज, पीपीई किटसह आदी साहित्यांचा वापर करुन दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच स्वतंत्र वाहनाने बीडला आणले. ही करवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक भास्करराव सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.संतोष जोंधळे, भागवत, राहुल शिंदे, श्रीकांत उबाळे, दिलीप गित्ते चालक घुंगरट यांनी केली.

Exit mobile version