Site icon कार्यारंभ लाईव्ह

टाकळसिंगा येथे कोरोनाबाधीताचेच घर फोडले; लाखोंचा ऐवज चोरीला

ashti-takalsinga-chori

ashti-takalsinga-chori

आष्टी : येथील जैन मंदिरातील मुर्ती चोरीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच टाकळसिंग येथे एका कोरोनाबाधीताचे घर फोडले. ज्यांचं घर फोडले ते सभापती असून त्यांच्यावर नगर येथे कोरोनाचे उपचार सुरु आहेत. टाकळसिंगा हे गाव कंटेन्मेट असून येथे सामान्य नागरिकांनाही जाण्यास बंदी आहे. मात्र चोरटे आले, घर फोडून निघूनही गेले.

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ दशरथ जगताप यांचे एकत्र कुटुंब असून घरात पंधरा सदस्य आहेत. यातील तेरा जणांना कोरोनाची लागण झाल्याने ते नगरला उपचार घेत आहेत. तर घरी दिव्यांग मुलगा व भाचा आहेत. गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट, कपडे, याची उचका पाचक करीत सोने, रोख असा लाखो रूपयांचा ऐवज चोरी केला. हा सगळा प्रकार त्यांच्या भाच्याने सकाळी पाहिल्यावर लक्षात आला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अद्याप कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
याबाबत आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आले असून फिर्यादी हे नगर येथे उपचार घेत आहेत. अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

इतका ऐवज गेला चोरीला
घरातील कपाटात ठेवलेले तीस तोळे सोने होते. त्या पैकी अठरा तोळे चोरीला गेले बाकी कपड्यात सापडले तर दिड लाख रुपये रोख होते. तीस हजार मिळाले तर एक लाख वीस हजार रुपये रोख चोरीला गेले. मी नगर येथे उपचार घेत आहे. डिस्चार्ज मिळाली कि स्वतःहा आष्टी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देणार असल्याचे सभापती बद्रीनाथ जगताप म्हणाले.

Exit mobile version