Site icon कार्यारंभ लाईव्ह

17 खासदारांना कोरोनाची लागण!

Corona

Corona

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : दिवसेंनदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण वाढतच आहेत. नुकतेच संसदेचं लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं असून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकसभेतील मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह 17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
        रविवारी पाच खासदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनतर लोकसभेतील खासदारांची कोरोना चाचणी केली होती. काही खासदारांचे काल रिपोर्ट आले तर काहींचे आज. त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत ही माहिती दिली. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. तर अद्याप काही खासदारांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी होते. ते आता आले असून एकूण 17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खबरदारी घेण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

अशा प्रकारे संसदेत घेतली जाते खबरदारी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संसद शनिवारी आणि रविवारी सुरू असणार आहे., सकाळी लोकसभा आणि दुपारी राज्यसभा असे कामकाज असेल. लोकसभेत आणि राज्यसभेत कागदाचा वापर कमी करण्यात आलाय. त्याचबरोबर संसद भवनात संपूर्णपणे डिजिटल पत्रव्यवहार होईल. आणि खासदार आपली उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवतील., सभागृहात प्रवेश करणार्‍या सर्व लोकांचे शरीराचे तापमान तपासण्यासाठी थर्मल गन आणि थर्मल स्कॅनर वापरल्या जातील., ठिक ठिकाणी टचलेस सॅनिटायझर्स बसविण्यात येतील. आपत्कालीन व्यवस्था, वैद्यकीय पथक, स्टँडबाईवर रुग्णवाहिका, संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने स्वच्छताही केली जाईल.

Exit mobile version