Site icon कार्यारंभ लाईव्ह

राजस्थानच्या व्यक्तीवर अंबाजोगाईत गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराजांचा सोशल मीडियावर अवमान


अंबाजोगाई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केल्याने राजस्थानातील व्यक्तीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बोधीघाट येथील तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली होती.
अमोल उर्फ मुक्तेश्वर भानुदास वाघमारे (रा. बोधीघाट, अंबाजोगाई) असे त्या तक्रारकर्त्या तरुणाचे नाव आहे. तक्रारीत अमोलने नमूद केले आहे कि, रविवार (दि.13) रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास ताराचंद शेखावत (रा. भिलवाडा, राजस्थान) या व्यक्तीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोशाख केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र पोस्ट केले. त्यामुळे आमच्या सामाजिक भावना दुखावल्या आहेत. या छायाचित्रात आमचे आदर्श कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र सार्वजनिकरित्या कलुषित केले आहे. अशी तुलना करणे योग्य नाही. सामाजिक तणाव निर्माण करून सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचा उद्देशाने ताराचंद शेखावत याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अनाठायी तुलना करणारे छायाचित्र सोशल मिडीयावर पोस्ट करून व्हायरल केले आहे असा तक्रारीत उल्लेख आहे. सदर तक्रारीवरून ताराचंद शेखावत याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Exit mobile version