Site icon कार्यारंभ लाईव्ह

माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले

Majalgaon

Majalgaon

सिंदफणा नदीत 22 हजार क्युसेकने विसर्ग सुरू

माजलगाव : धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी 11 दरवाजे उघडले आहेत. 22 हजार 57 क्युसेक पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

  माजलगाव धरणातून मागील अनेक दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या आवकनूसार पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी दिवसभर व रात्री झालेल्या पावसामुळे सोमवारी माजलगाव धरणात आवक वाढली. त्यामुळे सोमवारी सकाळी 11 दरवाजातून 22 हजार 57 क्युसेक पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. उपयुक्त पाणीसाठा 312 दलघमी, एकूण पाणीसाठा 454 दलघमी तर धरणात आवक 22 हजार 57 क्युसेक आहे. धरण क्षेत्रात ज्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरण अभियंता बी.आर.शेख यांनी दिली.

Exit mobile version