Site icon कार्यारंभ लाईव्ह

राजा रामास्वामी यांना शौर्यपदक

r raja

  बीड  दि.25 : शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना पोलीस शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे बीड पोलीस दलाची मान उंचवणारा हा सन्मान आहे.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्यपूर्ण कामगिरीसाठी पोलीस शौर्यपदक, उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक दिले जाते. बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सर्व स्तरातून राजा रामास्वामी यांचे अभिनंदन होत आहे.
—————-

Exit mobile version