Site icon कार्यारंभ लाईव्ह

बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

accident

बीड दि.30 : भरधाव बसने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.30) माजलगाव शहराजवळील पाथरी रोडवर झाला. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
शुभम अनंतराव सुरवसे (वय 27 रा.देवगाव ता.वडवणी) व गणेश जेटे (वय 23 रा.घाळटवाडी ता.माजलगाव) व अन्य तिघे हे दोन दुचाकीवरुन (एमएच 44 व्ही-6182) माजलगावरुन घाळाटवाडी येथे जात होते. माजलगाव शहराजवळील पाथरी रोडवर भरधाव बसने दोन्ही दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये शुभम व गणेशचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version