Site icon कार्यारंभ लाईव्ह

आष्टी तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

ACB TRAP

बीड  ः आष्टी येथील तहसील कार्यालयात एसीबीने सोमवारी (दि.8) कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अजिनाथ मधुकर बांदल (वय 41) असे लाचखोर अव्वल कारकुनाचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास स्वस्त धान्य दुकानाचे परवाना नुतनीकरण करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली होती. सदरील लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील अजिनाथ बांदल यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, अमोल बागलाने, सखाराम घोलम, विजय बरखडे, संतोष मोरे यांनी केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Exit mobile version