Site icon कार्यारंभ लाईव्ह

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मच्याऱ्याचा मृत्यू

बीड दि. 9 : रात्रगस्तीवर असेलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा अद्यात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना धूळे-सोलापूर महामार्गावर गढी उड्डाणपुलावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर पेट्रोलिंग करत होते. मंगळवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास गाडीच्याखाली (एमएच 23 एफ 5143) उतरले असता अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version