Site icon कार्यारंभ लाईव्ह

क्षुल्लक कारणावरुन मित्रावर चाकूने वार; उपचारादरम्यान मृत्यू

crime

नवीन बस स्थानकातील घटना;
तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल
 माजलगाव दि.26 : शहरातील आझाद नगर भागात वास्तव करीत असलेल्या भागवत अशोक आगे व त्याचा मित्र महेश अशोक सोळंके यांच्यात मंगळवारी (दि.23) क्षुल्लक कारणावरून नवीन बसस्थानकात मारहाण झाली. यावेळी चाकूने वार केल्यामुळे भागवत आगे हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       मयत व आरोपी हे दोघे अनेक वर्षापासून मित्र होते. हे दोघे मंगळवारी सोबत जेवण करून नवीन बसस्थानकात असलेल्या शौचालयाजवळ बसले असता त्याच्यात शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. भागवत आगे याने महेश सोळंके यास चाकुने मांडीवर वार केला. त्यांनतर महेश सोळंके यांनी त्याचा भाऊ व मित्रा त्या ठिकाणी बोलावुन घेतले. यानंतर चांगलीच बाचाबाची होऊन महेश सोळंके, मारोती सोळंके व अशोक सावंत या तिघांना मिळुन भागवत यास मारहान करत चाकु व दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले होते. त्यास डोक्यात व गुप्त अंगावर चांगल्याच इजा झाल्या होत्या. त्यास उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी त्यावर प्रथमोपचार करत त्यास बीड येथे पुढील उपचारासाठी पाठवले होते. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. विजय अशोक आगे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीसात महेश अशोक सोळंके, मारोती अशोक सोळंके रा.फुलेनगर, अशोक सावंत रा.शिवाजीनगर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील महेश सोळंके यास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन दोन आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत. 

Exit mobile version