Site icon कार्यारंभ लाईव्ह

कृषी कायद्याला विरोध करणार्‍या भाजपाच्या आमदाराला शेतकर्‍यांनी धुतले

delhi vidhayak
echo adrotate_group(3);

दिल्ली, दि. 27 : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे पंजाबमध्ये पहायला मिळत आहे. येथील एक भाजपा आमदार पत्रकार परिषदेला आल्याचे कळताच शेतकर्‍याच्या एका गटाने ह्या भाजपा आमदाराला इतके धुतले की त्याच्या अंगावरचे कपडे देखील अक्षरशः फाडून टाकण्यात आले होते. नंतर पोलीसांनी या आमदाराची शेतकर्‍यांच्या तावडीतून मुक्तता करून एका दुकानात त्यांना कोंडून घेतले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मागील काही महिन्यांपासून पंजाबमधील भाजपा नेते शेतकर्‍यांच्या रोषाचा सामना करत आहेत. त्यातच आता पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये शेतकर्‍यांच्या गटाने भाजपा आमदाराला निशाणा बनल्याचा प्रकार समोर आला आहे. अबोहरचे आमदार नारंग हे शनिवारी स्थानिक नेत्यांसह मलोतमध्ये पत्रकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांना आंदोलक शेतकर्‍यांनी घेराव घातला. त्यानंतर काही शेतकर्‍यांनी त्यांच्या दिशने शाई फेकली. अचानक झालेल्या शाही हल्ल्यानंतर पोलिसांनी नारंग यांना भाजपाच्या स्थानिक नेत्यांनं एका दुकानात नेलं. मात्र, थोड्या वेळाने आमदार नारंग आणि भाजपा कार्यकर्ते बाहेर आल्यानंतर शेतकर्‍यांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी आमदार यांचे कपडेही फाडले. या घटनेनंतर पीटीआयशी बोलताना आमदार नारंग म्हणाले, मी मलोतमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी गेलो होतो, मात्र शेतकर्‍यांनी परवानगी दिली नाही. शेतकरी आक्रमक झाले आणि मला वेढा दिला. मला काही शेतकर्‍यांनी धक्के मारले. त्याचबरोबर माझे कपडेही फाडण्यात आले. आमदार नारंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी निषेध केला आहे. त्याचबरोबर शिरोमणी अकाली दलानेही नाराजी व्यक्त करत घटनेचा निषेध केला आहे. भाजपा आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी 250 ते 300 अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींविरुद्ध भाजपा आमदाराच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.echo adrotate_group(7);

echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);

Exit mobile version