Site icon कार्यारंभ लाईव्ह

राज्यात शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन

echo adrotate_group(3);

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. काही कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच नाईट कर्फ्यू देखील लागू असेल असं त्यांनी सांगितलं. जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नसला तरी 30 एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले आहेत.
काय सुरु, काय बंद
शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन. लोकल ट्रेन सुरू राहणार. जिम बंद होणार. अत्यावश्यक सेवांना परवनगी. रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार. अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी. रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील. सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद. गार्डन, मैदाने बंद. सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही. रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक, बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल. टॅक्सीत मास्क घालावा. कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना. मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी. चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी. बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल. शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील. प्रतिबंधित क्षेत्र तयार करा. सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार. 20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी. लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित. विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार. गेल्या काही दिवसांपासून रोज 40 हजारांच्या वर रुग्ण समोर येत आहेत. आधीपासूनच राज्यातील पुण्यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.echo adrotate_group(7); echo adrotate_group(1);echo adrotate_group(5);

Exit mobile version