Site icon कार्यारंभ लाईव्ह

ग्रामीण भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

school Palwan

school Palwan

echo adrotate_group(3);

राज्य सरकारचा निर्णय

शाळांना घातले विविध नियम

मुंबई, दि. 5 : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला.

ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. त्यामुळे अनेक गाव हे कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे अशा भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. मात्र या साठी ग्रामपंचायतीने शाळेच्या अखत्यारीतील पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहे.

शाळेत टप्या टप्याने बोलवण्यात येणार आहे. कोविड संबंधी नियमांचे पालन करावे लागणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी बसवता येणार आहे. तसंच दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे लागणार आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी संख्या मर्यादित असणार आहे. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे पाळव लागणार आहे. कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात येईल आणि लगेच कोरोना चाचणी करावी लागणार आहे. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी लागणार आहे किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.echo adrotate_group(7); echo adrotate_group(1);echo adrotate_group(5);

Exit mobile version