बीड दि.28 : मागील काही दिवसापासून बदल्यांची चर्चा जोरात सुरु होती. बदल्या कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर बदल्यांचा महूर्त ठरला असून आज गुरुवार (दि.29) रोजी जिल्ह्यातील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या 350 पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत.
एकाच ठिकाणी पाच वर्ष सेवा पूर्ण करणारे, तालुक्यात 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचार्यांच्या प्रशासकिय कारणास्तव व समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालय, बीड येथे हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. ज्या अंमलदारांना विनंतीच्या अनुषंगाने काही कागदपत्र सादर करायचे असतील त्यांनी सोबत आणावे. प्रत्येकाशी संवाद साधून चर्चा करुन विनंती प्रमाणे बदल्या करण्यात येणार आहे.
मुहूर्त ठरला! 350 पोलीस कर्मचार्यांच्या होणार बदल्या
