Site icon कार्यारंभ लाईव्ह

ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भवती महिलेसोबत गैरवर्तन

echo adrotate_group(3);

‘स्वाराती’तील प्रकार; अधिष्ठातांचे चौकशीचे आदेश

अंबाजोगाई : गर्भवती असलेल्या गुलनाज इरशाद खान (रा.अकोला) या महिलेस ऑपरेशन थिएटरमध्ये शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येथील स्वाराती रुग्णालयात रविवारी (दि.13) घडला होता. या प्रकाराबाबतच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी मंगळवारी एक समिती नेमली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.echo adrotate_group(6);

महिलेचे पती इरशाद खान (रा.अकोला) यांनी अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्याकडे सोमवारी (दि.14) लेखी तक्रार केली होती. त्यांच्या पत्नी गुलनाज खान यांना प्रसूतीच्या कळा येत असल्याने स्वाराती रुग्णालयातील लेबर रूममध्ये दाखल करण्यात आले. यावेळी सिझेरीयन करत असताना गुलनाज या अल्लाहचे नामकरण करत होत्या. तेव्हा देव नाही, तुझा अल्ला नाही, आम्ही तुला वाचणार आहोत, काय खाऊन एवढे वजन वाढवले? आता 100 किलोचे तुझे वजन कोण उचलणार? असे म्हणत स्ट्रेचरला लाथ मारली आणि तोंडावर चापटा मारत होते. तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये हमको पीनी है…’ असे गाणे गात एकमेकांसोबत थट्टामस्करी करून भेदभावाची वागणूक देत होते, अशाप्रकारे गैरवर्तन करणार्‍या ऑपरेशन थिएटरमधील दोषी व्यक्तींवर चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी महिलेचे पती इरशाद खान यांनी केली. निवेदनावर रमीज शेख, पठाण आयाज खान, रेहान जागीरदार यांच्या स्वाक्षर्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने एका समितीमार्फत चौकशी सुरू असून चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना म्हटले. दरम्यान, या तक्रारीने स्वाराती रुग्णालय वर्तुळात खळबळ उडाली होती.echo adrotate_group(5); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);

Exit mobile version