Site icon कार्यारंभ लाईव्ह

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

ACB TRAP


बीड दि.21 : सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी शिरुर तालुक्यातील एका तलाठ्यावर सोमवारी (दि.21) बीड एसीबीने कारवाई केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

नामदेव राजेंद्र पाखरे (वय 36) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. पाखरे हे शिरुर तालुक्यातील गोमाळवाडा सज्जाचे तलाठी असून सध्या सध्या मंडळ अधिकारी कार्यालय शिरुर (का) येथे कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपयांची मागणी केली. तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी पोखरे तलाठ्यावर सोमवारी (दि.21) बीड एसीबीने कारवाई केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे यांनी केली. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version