mushakraj

गेवराई

मुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा

By Balaji Margude

August 30, 2020

echo adrotate_group(3);

मुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा

बालाजी मारगुडे, बीडमो.9404350898

माजलगावचा बारश्याचा कार्यक्रम आटोपून बाप्पा आणि मुषकराज पुढच्या मुक्कामी निघाले होते. इकडे पृथ्वीतलाव आल्याचा बाप्पांचा आजचा नववा दिवस होता. अजून तर अर्धा जिल्हा फिरायचा राहीला असल्याने बाप्पाने गेवराईचा बेत रद्द करून गढीवरूनच बीड गाठण्याचा निर्णय घेतला. याची खबर ‘जगवती’ या मतदारप्रमुखांच्या बंगल्यावर आणि ‘नादानबाबा’च्या बंगल्यावर आणि इकडं बीडात ‘शिवपत्र’वर पोहोचली होती. तसे गेवराईतून नादानबाबा ‘बदामी’ रंगाचा शर्ट, अन् बदामीच रंगाच्या लुंगीवर तातडीने गढीला पोहोचले.नादानबाबा ः बाप्पा तुम्ही असा कसा निर्णय घेऊ शकतात. नक्कीच त्या ‘शिवपत्र’ वरच्या ‘हुश्यार माणसा’ची चाल असणार… त्यो कळूच देत नाईऽऽ असं कशातबी राजकारण करतोय..मुषक ः नाहीऽऽ नाहीऽऽऽ त्याचं काय आहे नादानबाबा….नादानबाबा ः मुषका तू गप्प बस्स्… तुच त्या हुशार माणसाला मॅनेज झाला असणारऽऽबाप्पा ः (नादानबाबांना समजावत) तुम्ही जरा शांत व्हा! तुम्हाला सगळा तपशीलवार दौरा सांगतो. सत्य हेच की ‘रात्रं कमी अन् सोंगं फार’ करायचीत अजून… बीडला जाऊन मोठ्या बंगल्यात काय सुरुये बघायचंय… जिल्हा प्रशासनाच्या तर लैच तक्रारीयेत… पोलीस खात्यात सोनं खरेदी जोरात सुरुयेऽऽ असं काय आहे कुणाच्या सोन्यात जरा मलापण सोबत घेऊन जाता येतंय का बघतोऽऽ तिकडे आष्टीत जर नाही गेलो तर ‘धसकट’बाबा रुसून बसायचे…नादानबाबा ः हां मग ठिकंय…बाप्पा ः ‘जगवती’वरून कुणीच कसं आलेलं दिसना..?नादानबाबा ः ते अजून जागलेच नसतील. ते इथल्या मतदारांचं प्रमुख… त्यामुळे त्यांच्या मागं सध्या दुनियेची काम दिसतायत… जवा चीनमदीच लॉकडाऊन होतं तवाच ह्यांनी पण ‘जगवती’ला कुलूप लावून घेतलं. तवापासून ते रस्त्यावर कुणालाच दिसले नाहीत बाप्पा… तरी एकदा ‘शिवपत्र’वरून त्या हुशार माणसाचा फोन आल्ता. त्यो कुलूप लाऊन घरात काय करतोय जरा पहाय बरं म्हणला व्हता. पण मणलं. लोकांच्या घरात आपुन अजिबात डोकवत नाय… जे काय राजकारण करायचं ते रस्त्यावर इथं… आता त्यो घरात राशनचे गहू का निसत बसना… आपल्याला काय त्याचं?बाप्पा ः पण मतदाराचा त्यो प्रमुख. तुम्ही त्याचे विरोधक म्हणल्यावर थोडीफार तर खबरबात ठेवलीच पाहीजे ना..?नादानबाबा ः तशी ठेवतो ना अपुनबी त्याची खबर… सध्या त्यो राशनचा गहू आंबवून त्यांच्यापासून सकाळी सकाळी प्यायला ‘अरुणोदय’ नावाचा आयुर्वेदीक काढा बनवितोय. सध्या त्या काढ्याचीच आमच्या गेवराईत चर्चा सुरुये… अख्ख्या लॉकडाऊनमधी त्यांनी राशनचा गहू गोळा करून दिल्ली, मध्यप्रदेश, हरयाणा, उत्तरप्रदेश इतकंच काय पण मोदींच्या गुजरामधीपण काढा पुरविला… ‘राजडीप’च्या बाजुलाच काढ्याला आल्टी-पल्टी, उकळून गरम करण्याची त्यांची फॅक्ट्रीये…बाप्पा ः अस्सं म्हणतोस… त्याचा काढा प्यायला पुन्हा कधीतरी नक्की येणार… येणार म्हणजे येणार…नादानबाबा ः हा काढा गेवराई अन् बीडच्या महसूल विभागात लैच लोकप्रिय… इच्चारूच नका…मुषक ः बाप्पा बाप्पा ते बगा… थेट बीडाहून (ट्रॅकसूटवर) रनिंग करीत करीत ‘शिवपत्र’वरचे समरसिंह खिंडित उर्फ भैय्यासाब उर्फ गुगलचे सीईओ आलेऽऽबाप्पा ः गुगलचे सीईओ…? ही काय नविन पदवी…?नादानआबा ः अहो ते सदान कदा आकडेमोड करीत बसतेत ना म्हणून… कुठल्या गावात किती माणसं..? कुणाच्या घरात महिला-पुरुष किती? त्यात 18 वर्षाचे म्हणजेच मतदार किती? त्यात आपला इरोधक कोण? त्याच्या मागं माणसं किती? मग त्यानं इरोध करूनबी आपल्याला अमूक गावात मतदान किती पडणार? हे ते अचूक काढतेत…? त्यामुळं आम्ही गेवराईकर त्यांना गुगलचे सीईओ म्हणतो… मागे त्या धसकटरांवांनी त्यांचं नामकरण केल्तं.(तितक्यात भैय्यासाब त्यांच्याजवळ जाऊन पोहोचतात…)भैय्यासाब ः (हातावर लावलेल्या काळ्या घड्याळात बघून) 50 कमी पडल्या फक्त 50, तुम्ही (गणपती बाप्पांकडे बघून) एकतर सिरसफाट्यावर किंवा मग आपल्या जयभवानी मंदिरात थांबले असते तर हे 50 भरून निघलं असतं.मुषक ः काय कमी पडले? कसले कमी पडले? अहो इथं बाप्पा आलेत… काय मागायचं ते मागा… कमी पडलेलं सगळं भरून देतेल.भैय्यासाब ः अरे मुषका तुझी उंची किती? तू बोलतो किती? तु तुझ्या पगाराऐवढं बोलत जा ना रेऽऽ आता मला 50 कॅलरीज कमी पडल्या… कुठून देणार बाप्पाऽऽ? त्यासाठी माझं मलाच पळावं लागणार ना? मला तसंल हवेत बंदुका झाडायला जमत नाही. घरून निघतानाच मला अंदाज आला व्हता. ‘दिग्विजयसिंह’ला मी म्हटलं देखील. आज 50 कमी पडणार… आपला अंदाज कधीच फेल नाही जात.नादानबाबा ः मुषका ह्यांना गव्हाचा काढा पाज पलिकडं नेवून… ह्यांचे 50 लगेच भरून निघतील…समरसिंह ः गव्हाचा काढा अन् मला…? छेऽ छेऽऽ तिकडं वाळुचा काढा पिऊन घेईल पण असला गोरगरीबांच्या पोटात जाणारा गव्हाचा काढा आपण कधीच पिणार नाही. अन् वढ्याचं पाणी तांब्यानं पेणारांनी मी काढा प्यायचा का आणखी काय? हे शिकवायची गरज नाही.नादानबाबा ः अरे जा रेऽऽ, तू तर लोकांच्या गिलासाला तोंडपण लावीत नाहीस, इतका निर्मळ वागतू… मी गोरगरीबाचा बाबाय… मला वड्याचंबी पाणी जमतं… काढ्याचं बी जमतं अन् तुला पाडायबी जमतं… तुझा हुश्यारपणा तिकंड मुंबई-पुण्यात दाखवायचा हीकडं बाप्पासमोर नाई…echo adrotate_group(6);

(समरसिंह आणि नादानबाबाची ही भांडणं पुढं टोकाला गेली. नादानबाबा हाताच्या दोन्ही मुठी आवळत समरसिंहाना ठोसा देण्यास पुढे सरसावले. तेवढ्यात बाप्पांनी त्यांचा हात धरला. त्यानंतर नादानबाबा दूर कुठतरी पळत गेले अन् एक इटकर हाती घेत ती समरसिंहाच्या दिशेनं भिरकावली… पण बाप्पांनी ती इटकर आपल्या सोंडेंत अलगद झेलली. या दोघांची असली भांडणं बाप्पांनी अनेकदा बघीतलेली होती. त्यामुळे कुणालाच त्याचं विशेष काही वाटलं नाही. ह्या दोघांची भांडणं मिटवून बाप्पा बीडच्या दिशेने निघाले..)(हे सदर केवळ मनोरंजनासाठी आहे. यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यातील लिखानाचा कुठल्याही जिवीत वा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)echo adrotate_group(8);

मुषकराज भाग 1 : ‘चेडेश्वरी’ दिस्तोय का बघ…echo adrotate_group(9);

मुषकराज भाग 2 : बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज भाग 5 :परळी जिल्हा…

मुषकराज भाग 6 : थर्मल गन

मुषकराज भाग 7 : ‘बदका’चं डुबूक डुबूक

मुषकराज भाग 8 : बारश्याचा कार्यक्रम echo adrotate_group(10);