Site icon कार्यारंभ लाईव्ह

पंकजाताई मुंडे गुरूवारी बीड जिल्ह्यात

pankaja munde

pankaja munde

बीडसह मराठवाड्यात अतिवृष्टी पाहणी दौरा

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे ह्या अखेर जिल्ह्यात पाऊल ठेवत आहेत. त्या बीडसह मराठवाड्याचा 20 आणि 21 ऑक्टोबर या दिवशी दौरा करणार असून गुरुवारी त्या बीड जिल्ह्यात येत आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

  पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा करत आहेत. सुरवातीस त्यांनी नांदेड, हिंगोली, परभणी व बीड असा दौरा ठरला होता. परंतू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दौर्‍यावर येत असल्याने त्या देखील मंगळवारपर्यंत नांदेडचा दौरा संपवून फडणवीस यांच्यासोबत अतिवृष्टी पाहणी करणार आहेत. गुरुवारी (दि.22) सकाळी त्या औरंगाबाद येथून शहागड (जि.जालना), गेवराई, बीड, वडवणी, तेलगाव, सिरसाळा मार्गे गोपीनाथ गडावर दर्शन घेणार आहेत. व परळीत मुक्कामी असणार आहेत, अशी माहिती आहे. दरम्यान, परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्या करत असलेला हा पहिलाच सार्वजनिक दौरा आहे.

Exit mobile version