Site icon कार्यारंभ लाईव्ह

नाशिकात खडसेंच्या कार्यक्रमात सोन्याची चैन चोरणारा गजाआड

arrested criminal corona positive

beed police

बीड एलसीबीची कारवाई

बीड दि.7 : नाशिक येथे एकनाथ खडसे यांच्या दौर्‍यामध्ये एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील 127 तोळ्याची चैन लंपास करण्यात आली होती. सदरील आरोपी हा बीडचा असल्याची माहिती बीड एलसीबीला मिळाली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याकडून चैन हस्तगत केली व आरोपीला चांदवड पोलिसांच्या स्वाधीन केले. 
       24 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता एकनाथ खडसे हे मुंबईहून जळगावकडे जात होते. दरम्यान नाशिक येथील चौकात चौफुलीजवळ हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार ठेवला होता. त्यावेळेस प्रसाद आबासाहेब देशमुख यांच्या गळ्यातील 127 ग्रॅमची चैन आरोपी प्रवीण विजय गायकवाड (वय 24, रा. गांधीनगर बीड) लंपास केली. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात त्याच दिवशी अज्ञात आरोपीविरोधात कलम 356, 379 नुसार गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.विजय गोसावी, पोना.कैलास ठोंबरे, सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, प्रसाद कदम, सतीश कातखडे व चालक वंजारे यांनी त्यास ताब्यात घेतले. चैन हस्तगत करुन त्यास चांदवड पोलीसांच्या स्वाधीन केले.

Exit mobile version