बीड दि.23 : तब्बल 22 हजार रुपयांना रेमडिसीवीर इंजेक्शन विकताना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्शन परिसरात शुक्रवारी (दि.23) रात्री दोन तरुणांना पोलीसांनी पकडले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन देताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस कर्मचारी संघर्ष गोरे यांनी दोन तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. श्रेयस बाबासाहेब नाईकवाडे (ता. धारूर) व कृष्णा ठोंबरे (रा.दहिफळ ता.केज) अशी पकडलेल्या तरुणांची नावे आहेत.
22 हजारांना रेमडिसीवीर विकताना दोन तरुण पकडले!
