Site icon कार्यारंभ लाईव्ह

हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात बुडवलं पाहिजे

udhav thakarey

मुंबई | भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. इम्पिरिकल डाटा तयार करून, ट्रिपल टेस्ट करून ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली असती तर हजार टक्के ओबीसी आरक्षण वाचलं असतं. पण हे सरकार आणि या सरकारमधले बोलघेवडे, खोटारडे, बदमाश, लफंगे मंत्री यांना समुद्रात बुडवलं पाहिजे, असं लोणीकर म्हणालेत.

तुम्ही गावागावात जाऊन सांगा की ही बेईमान औलाद आहे. हिरव्या हराळीमध्ये साप दिसत नाही. हा महाराष्ट्रातला तीन पक्षांचा विषारी साप किती विषारी आहे हे गावागावात समजावून सांगावं लागेल, अशी टीका त्यांनी केलीये.

मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. दिल्लीत, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. सगळा देश काँग्रेसच्या ताब्यात होता. तेव्हा हा सर्वे झाला होता. त्यात 69 हजार चुका होत्या. तो डाटा कधीच मनमोहन सिंग सरकारने कुठल्या राज्याला दिला नाही, असं त्यांनी सांगितलं.

काँग्रेसने 50 वर्षांच्या हयातीत तो डाटा बाहेर काढला नाही. पण राज्यातले ओबीसी मंत्री देखावा निर्माण करत आहेत, असं म्हणत त्यांनी सरकावर टीकास्त्र सोडलं आहे.

Exit mobile version