Site icon कार्यारंभ लाईव्ह

लवकर बरा होऊन परत कामाला लाग पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंना फोन

pankaja munde dhananjay munde

बीड  : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी धनंजय मुंडे लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. तसे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले गेले. मात्र आता पंकजाताई मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांची फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे.

एबीपी माझा वृत्त वाहीनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की,  पंकजाताई मुंडे यांनी आपले बंधू धनंजय मुंडे यांना फोन करून कसा आहेस? अशी विचारपूस केली. लवकर बरा हो, परत कामाला लाग, घरातील सगळी कशी आहेत? लहान मुलं आणि त्यांच्या पत्नीबद्दलही विचारपूस केल्याचे बातमीत म्हटले आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज पहाटे समजले होते. त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यांना कुठलीही लक्षण दिसत नाहीत. ते ठणठणीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. मुंडे यांच्यासोबतच त्यांचा एक स्वीय सहायक, दोन गाडी चालक आणि कूक यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

Exit mobile version