Site icon कार्यारंभ लाईव्ह

परळी शहर पोलीसांनी लाखोंचा गुटखा पकडला

parali

व्हीआयपी कारमधून गुटख्याची वाहतूक, कारसह दोघे ताब्यात

 परळी : येथील शहर पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.14) सकाळी लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. चक्क व्हिआयपी कारमधून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला असून कार जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     शहरातील नटराज रंग मंदिर परिसरातून एक कार (एमएच-44 एस-1789) भरधाव जात होती. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात गाडीचे जोरात चाक आदळले. त्यामुळे स्पॉटवर ड्युटीला असलेल्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या सपोनि.आरती जाधव यांनी कारला आडवले. यावेळी कारच्या डिक्कीमध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला. कार जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सपोनि.आरती जाधव यांनी दिली.

चेकपोस्ट असताना शहरात गुटखा येता कसा?
कोराना विषाणूच्या पार्श्वभुमीवर जिल्हाभरामध्ये चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. या चेकपोस्टवरुन व्हीआयपी कार कुठलाही पास नसताना शहरात प्रवेश कसा करते असा प्रश्न उपस्थित होतोय. ज्या चेकपोस्टवरुन गुटख्याची कार शहरात आली त्या चेकपोस्टवरील पोलीसांवर कारवाई करण्याची गरज आहे.


गुटखा माफियांचे वरिष्ठांशी लागेबांधे
परळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची व्रिकी केली जाते. दररोज लाखो रुपयांचा गुटखा खुलेआम परराज्यातून, परजिल्ह्यातून परळी शहरात येतो. मात्र परळी शहर पोलीस, संभाजीनगर पोलीस, परळी ग्रामीण पोलीस यावर कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत. कारण गुटखा माफियांचे वरिष्ठांशीच लागेबांधे असल्याचे बोलेले जात आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Exit mobile version