Site icon कार्यारंभ लाईव्ह

देवस्थान जमिनीची बेकायदेशीर विक्री

land

land

echo adrotate_group(3);

माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथील नृसिंह देवस्थानची गट नं.88 मध्यील जमिनीची बेकायदेशिर विक्री व बळकावल्या प्रकरणी संबधित दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालखेड ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
echo adrotate_group(6);

या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक कराecho adrotate_group(5);


माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे जागृत नृसिंह देवस्थान आहे. या देवस्थानला तालखेड शिवारातील गट नं.88 येथे जमिन असून 14 गुंठ्ठे जमिन ही बेकायदेशिर रित्या जिवन खेडकर व धनंजय खेडकर यानी संगणमताने 99 वर्षे भाडे करारावर सायरा बेगम महेमद मसियोद्दीन यांना दिलेली आहे. त्यांनी तीच 14 गुंठ्ठे जमिन इतर सात लोकांना बेकायदेशिरपणे विकलेली आहे. तसेच गट नं.88 मध्ये विद्युत पंपाचे कनेक्शन बेकायदेशीर घेतलेले आहे. तसेच बोगस देवस्थान पी.टी.आर.घर नंबर 208 ग्रामपंचायत तालखेड यांनी बनवून न्यायालय धर्मादाय बीड या ठिकाणी गैरवापर केला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यानी ग्रामसेवक पवार याचे एक वर्षाचे वेतन बेद केल्याचे आदेश दि.8 मे 2020 रोजी दिलेले आहे. ह्या पी.टी.आर.चा दुरूउपयोग करणार्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात यावा, त्यात जिवन रंगनाथ खेडकर, धनंजय रंगनाथ खेडकर व तसेच जमीन विक्री केलेल्या व्यक्ती किसन बालासाहेब पाटील, अशोक किसनराव रनसकर, जिवन रंगनाथ खेडकर यांच्या देखील गुन्हा नोंद करण्यात यावा. तसेच तालखेड येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या नृसिंह देवस्थान व खंडोबा देवस्थान या नावाने पुर्णतः बोगस खाते उघडून खात्यावर जिवन रंगनाथ खेडकर हे व्यवहार करत आहेत.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांकडून तक्रार दाखल करून घेण्यात येत नसून उडवा-उडवीचे उत्तर मिळत आहे. यामुळे दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालखेड येथील राधाबाई गिरीष पाटील व ग्रामस्थांनी अमरण उपोषण केले.echo adrotate_group(9);

धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयास पी.टी.आर. व बॅक खाते संदर्भाने पत्रव्यवहार करून. सदर प्रकरणाबाबत त्यांचे निर्देशानूसार पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

संतोष पाटील, पोलीस निरीक्षक, माजलगाव ग्रामीण ठाणे echo adrotate_group(10);

Exit mobile version