Site icon कार्यारंभ लाईव्ह

संत एकनाथ कारखाना : प्रल्हाद औटे यांचे संचालक पद रद्द

sant eknath sahkari sakhar karkhana paithan

sant eknath sahkari sakhar karkhana paithan

echo adrotate_group(3);

चेअरमन तुषार शिसोदे यांना चपराक

पैठण, दि.14 : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विहामांडवा ऊस उत्पादक गटातून निवडून आलेले प्रल्हाद औटे यांचे संचालक पद प्रादेशिक सहसंचालक योगीराज सुर्वे यांनी रद्द केले आहे. त्यामुळे व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांनी चेअरमन तुषार शिसोदे यांना राजकीय चपराक दिल्याचे बोलले जात आहे.

पैठण तालुक्यातील विहामांडवा ऊस उत्पादक गटातून संचालकपदी निवडून आलेले प्रल्हाद कल्याणराव औटे यांनी पैठण येथील मानसी महिला नागरी पतसंस्थेकडून 9 नोव्हेंबर 2015 रोजी दुचाकी वाहनासाठी 46 हजार रुपये कर्ज घेतले होते. दरम्यान कारखान्याची निवडणूक वेळेस थकबाकीदार असताना देखील निवडणूक लढविल्यामुळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांनी 23 जून 2020 रोजी औरंगाबाद सहाय्यक निबंधक तथा प्रादेशिक साखर सहसंचालक योगीराज सुर्वे यांच्याकडे औटे यांना संचालक पदावरून अपात्र घोषित करावे यासाठी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन मानसी महिला पतसंस्था व पैठण येथील सहाय्यक निबंधक यांच्या अहवालावरून सहकार अधिनियम 1950 चे कलम 73 व 1961 नियम 58 मधील तरतुदीनुसार प्रल्हाद कल्याणराव औटे यांचे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद रद्द करण्याचा अंतिम आदेश शुक्रवारी दिला. त्यामुळे व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांच्यासह दहा संचालकांनी कारखान्याच्या कामकाजाचा अधिकार काढून घेतलेल्या चेअरमन तुषार शिसोदे यांना चांगलीच राजकीय चपराक बसली आहे. या सुनावणीप्रसंगी तक्रारदार व्हाईस चेअरमन राऊत यांच्यावतीने अ‍ॅड उमेश बोडके यांनी कामकाज पाहिले आहे.echo adrotate_group(7); echo adrotate_group(10);echo adrotate_group(5);

Exit mobile version