Site icon कार्यारंभ लाईव्ह

स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल

harssh poddar

harsh poddar

तात्काळ कार्यमुक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

बीड  :  येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी ‘एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रशासकिय बदल्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल केले आहेत.
       स्थानिक गुन्हे शाखेतील हेकॉ.भास्कर केंद्रे, तांदळे, पोहेकॉ.रविंद्र गोले, सलीम हबीब शेख, डोंगरे यांच्यासह आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर तुळशीराम जगताप, अभिमन्यू औताडे, श्रीमंत उबाळे, संतोष हांगे, झुंंबर गर्जे, मुदतसर सिद्धीकी, अलिम शेख, शेख अन्वर अब्दुल रौफ, नारायण कोरडे, गोविंद काळे, गणेश नवले यांच्यासह आदींना स्थानिक गुन्हे शाखेशी सलग्न करण्यात आले होते. त्यांनाही मुळ नेमणुकीच्या ठिकाणी परत करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आता नवीन चेहरे दिसणार आहेत. मात्र अजुनही काही जुने वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेतच आहेत. त्यांनाही इतरत्र पाठवणे गरजेचे आहे. ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यामुळे पुर्णच पोलीस खाते मलीन होत आहे.   

या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी हे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.
Exit mobile version