Site icon कार्यारंभ लाईव्ह

रेखा जरे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन फेटाळला

echo adrotate_group(3);

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दै.सकाळचा अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक पत्रकार बाळ ज.बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळला.
      या गुन्ह्यात नाव आल्यापासून फरार असलेल्या बोठे याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी हा अर्ज दाखल केला होता. त्याला विरोध करताना पोलिसांनी सुनावणीच्यावेळी बोठे याला समक्ष हजर राहण्याचा आदेश देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. ती कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. आरोपीतर्फे अ‍ॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला होता. या प्रकरणात द्वेषातून बोठे याचे नाव गोवल्याचा आरोप त्यांनी केला होता. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.सतीश पाटील यांनी बाजू मांडली. या प्रकरणात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लेखी पुराव्यांचा समावेश असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते. यावर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज तो सुनावण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देत फरारी असलेल्या बोठे याच्यासमोरील अडचणी आता वाढल्या आहेत.

संपूर्ण घटनाक्रम
3 डिसेंबर: रेखा जरे हत्या प्रकरणात आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याचे नाव उघड झाल्यानंतर बोठे पसार, पोलिसांकडून शोध सुरूच
7 डिसेंबर: अटकपूर्व जामिनासाठी बाळ बोठेचा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज
8 डिसेंबर: न्यायालयात बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी, सरकारी पक्षाला नोटीस काढत म्हणणे मांडण्यास सांगितले
11 डिसेंबर: आरोपी बाळ बोठे याने अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना, न्यायालयात हजर राहण्याबाबत सरकारी पक्षाने दिला अर्ज
14 डिसेंबर: सरकारी पक्षाकडून देण्यात आलेल्या अर्जावर दोन्ही बाजूचे युक्तीवाद झाले. त्यानंतर सरकारी पक्षाचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला
15 डिसेंबर: बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल ठेवला राखीव
16 डिसेंबर: बोठे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाecho adrotate_group(6);

बोठे याचा शोध सुरूच
नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (30 नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे पसार आहे. बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. जरे यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हे बोठेच्या चौकशीतूनच समोर येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलीस आरोपी बोठे याचा कसून शोध घेत आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);

Exit mobile version