Site icon कार्यारंभ लाईव्ह

सर्व खासगी रुग्णालयांना लसीकरणास परवानगी

corona lasikaran

corona lasikaran

echo adrotate_group(3);

केंद्राकडून निर्देश

नवी दिल्ली, दि. 2 : लसीकरणासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मंगळवारी उशीरा दिशानिर्देश जारी करून खासगी रुग्णालयांनाही कोरोना लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयातील लसीकरणाचा ताण कमी होऊन देशात झपाट्याने लसीकरण पूर्ण होईल.

सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणार्‍या कोणत्याही खासगी रुग्णालयांला करोना लस देण्याची परवानगी देण्यात आलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केल्याप्रमाणे, कोणतंही खासगी रुग्णालय करोना लसीकरण केंद्र म्हणून काम करण्यासाठी परवानगी देण्यात आलीय.

खासगी रुग्णालयांना करोना लस देण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कर्मचारी, लाभार्थ्यांच्या देखरेखीसाठी योग्य व्यवस्था, लसीच्या देखभालीसाठी कोल्ड चैन तसंच लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम समोर आले तर त्यावर उपचार पुरवण्याची योग्य व्यवस्था असणं आवश्यक आहे. मंत्रालयाकडून केंद्र आणि राज्य सरकारला लसीकरण मोहिमेत तीन आरोग्य योजनांच्या पॅनलमध्ये सहभागी असलेल्या आणि निर्धारित नियमांचं पालन करणार्‍या सर्व खासगी रुग्णालयांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी योजनांमध्ये आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत 26000-27000 रुग्णालयांचा समावेश करण्यात आलाय. यातील जवळपास 12500 रुग्णालय खासगी क्षेत्रातील आहेत.
सोमवारपासून सुरू झालेल्या करोना लसीकरण मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. तसंच 45 वर्षांहून अधिक वय असणार्‍या परंतु गंभीर आजारांना तोंड देत असलेल्या व्यक्तींनाही करोना लस दिली जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत एकूण 1 कोटी 54 लाख 61 हजार 864 डोस दिले गेले आहेत. यामध्ये पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल 6 लाख 09 हजार 845 जणांना करोना लस देण्यात आली.echo adrotate_group(6); echo adrotate_group(1);echo adrotate_group(8);

Exit mobile version